मातृत्व
मातृत्व “तू नर्मदालयात का येत नाहीस ? बघ, इथली मुलं कशी छान खेळतात आणि अभ्यासही करतात”. कडेवर एक आणि हातात धरून एक अशा दोन छोट्या मुलींना आत्मविश्वासाने सांभाळणाऱ्या त्या सात वर्षाच्या कन्येला मी विचारलं. “या दोघी मोठ्या झाल्या की त्यांना पाठवणार आहे मी नर्मदालयात. मला वेळ कुठे असतो नर्मदालयात यायला ?” माझ्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्हं उमटली असावीत. घसरगुंडीवर खेळणाऱ्या दुसऱ्या मुलीने माहिती पुरवली – “दीदी, ही सोनी दाडकी (मजुरी) करायला जाते. ती कशी येईल नर्मदालयात ?” लेपा (बैरागढ) येथे आमच्या ‘निमाड अभ्युदय’ या संस्थेच्या वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे माझं आजकाल भट्टयाण येथे नर्मदा किनारी असलेल्या नर्मदालयात वारंवार जाणं होत नाही. लॉक डाऊनच्या काळात तर तिथे जाणं शक्यही नव्हतं. त्यामुळे गेल्या दोन वर्षात नव्याने यायला लागलेल्या मुलांच्या कौटुंबिक स्थितीबद्दल मी जरा अनभिज्ञच होते. पण या मुलीच्या कहाणीने मात्र मला अस्वस्थ केलं. सोनी आमच्या नर्मदालयाच्या जवळच राहते. दिवसभर ती कधीच दिसत नाही. फक्त संध्याकाळीच घसरगुंडी खेळायला तिच्या बरोबर दोन छोटया मुलींना घेऊन येते. लॉक डाऊनच्या