गोष्ट एका शाळेची (11)
गोष्ट एका शाळेची (11) औषधांचा परिणाम असेल कदाचित पण रात्री बारा नंतर खूप गाढ झोप लागली. सकाळी आठ वाजता डॉ. खोंड आणि सिविल सर्जन डॉ. बोरगोहाय मला तपासायला आले. १०२ डिग्री ताप अजूनही होताच . आणखी नवीन काही औषधे चालू केली. सलाईन तर चालूच होतं. मी दवाखान्यात अॅडमिटआहे ही बातमी मुलांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांना समजली. एकेक जण मला भेटायला येऊ लागले. कुणी चहा-दूध, फळं-बिस्किटस् आणली तर कुणी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणून दिली. दीप्तीने नाशिकच्या कर्नल फडकर यांच्याकडे निरोप पाठवला. फडकर दादा वहिनी निरोप समजताच मला भेटायला दवाखान्यात आले. त्याच वेळी प्रायव्हेट रूम रिकामी झाली असून सफाई करून तयार आहे, तिकडे शिफ्ट व्हा असा निरोप आला. ज्या पलंगावर मी झोपले होते तो पलंग आणि गादी पांघरूण- मच्छरदाणी हे सगळं दीप्तीच्या घरचं होतं. तिथेच सोडून कसं चालेल ? मला फडकर दादा वहिनींना हे सांगायचा संकोच होत होता. आणि ते सामान तिथे टाकून प्रायव्हेट रूम मध्ये जाता येत नव्हतं. मी प्रायव्हेट रूम मध्ये का जात नाही याचे उत्तर मला द्यावेच लागले. त्यात संकोच का करतेस असं म्हणत माझी गादी, पा