गेल्या काही महिन्यांपासून नर्मदालयाच्या गोशाळेसाठी गीर गाई खरेदी करायच्या होत्या. काही दात्यांनी त्यासाठी पैसेही पाठवले होते. पण आसपासच्या गावांमध्ये गीर गाई काही मिळेनात. एका दलालाने तर एक महिना आगाऊ पैसे घेऊन नंतर नाही म्हणाला. कुणी म्हणे चांगल्या प्रतीच्या गाई घ्यायच्या असतील तर गुजरात मध्ये राजकोट -जुनागढ मध्ये मिळतील. राजकोट येथील रामकृष्ण आश्रमातले श्री. जगन्नाथ महाराज ओळखीचे होते. त्यांना फोन केला. अकरा तासांचा प्रवास करून आम्ही 07 सप्टेंबर 2021 ला रामकृष्ण आश्रम, राजकोट येथे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमाचे अर्थात श्रीरामकृष्ण परमहंसाचे दोन भक्त श्री जयेश जी आणि श्री भरत जी आमच्या बरोबर गाई दाखवण्यासाठी निघाले. हरीकृपा गोशाळेत आम्ही गाई बघायला गेलो. अचानक पाऊस सुरू झाल्याने मी आडोशाला खुर्ची टाकून बसले. गोशाळेचे मालक श्री लक्ष्मण भाई माझ्याशी बोलायला आले. लेपा येथील आमच्या संस्थेच्या कामाबद्दल मी त्यांना थोडक्यात कल्पना दिली. पण त्यांच्या मनात मात्र दुसरेच विचार चालू असावेत. ते मला म्हणाले, “
Posts
- Get link
- Other Apps
16 ऑगस्ट रोजी माझ्या वडलांची म्हणजे स्व. कन्हैयालाल श्रीपत ठाकूर यांची तारखेने पुण्यतिथी असते. आम्ही भावंडे त्यांना अण्णा म्हणत असू. त्यांच्या दोन - तीन आठवणी आज मनात ताज्या झाल्या आहेत. अण्णा स्वातंत्र्य पूर्व काळात काही वर्षे नाशिक येथे पुणे अनाथ विद्यार्थी गृहात शिकले. साल मला ठाऊक नाही. त्या काळात या संस्थेला कुठलेही सरकारी अनुदान नसायचे. बहुधा तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. महागाई प्रचंड वाढली होती. त्यामुळें वार लावून- माधुकरी मागून शिक्षण होत असे. दर रविवारी त्यांच्या वर्गातल्या मुलांना नाशिक येथील काळा राम मंदिर परिसर झाडून स्वच्छ धुवावा लागे. मग कुणा दात्या तर्फे जेवण मिळत असे. तहसीलदार म्हणून अण्णा नाशिकला आले त्या वर्षी तालुका दंडाधिकारी म्हूणून राम नवमीला पूजेचा मान माझ्या आई अण्णांना मिळाला. मानाचा फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. पूजा चालू असताना अण्णांचे डोळे सारखे भरून येत होते. पुजाऱ्याने दोन तीनदा 'रावसाहेब, काही त्रास होतोय का ?' असेही विचारले. त्यावर साहजिकच अण्णा नाही म्हणाले. पूजा -सत्कार संपल्या नंतर पुजाऱ्यांना अण्णा म्हणाले, "शाळेत असता
मातृत्व
- Get link
- Other Apps
मातृत्व “तू नर्मदालयात का येत नाहीस ? बघ, इथली मुलं कशी छान खेळतात आणि अभ्यासही करतात”. कडेवर एक आणि हातात धरून एक अशा दोन छोट्या मुलींना आत्मविश्वासाने सांभाळणाऱ्या त्या सात वर्षाच्या कन्येला मी विचारलं. “या दोघी मोठ्या झाल्या की त्यांना पाठवणार आहे मी नर्मदालयात. मला वेळ कुठे असतो नर्मदालयात यायला ?” माझ्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्नचिन्हं उमटली असावीत. घसरगुंडीवर खेळणाऱ्या दुसऱ्या मुलीने माहिती पुरवली – “दीदी, ही सोनी दाडकी (मजुरी) करायला जाते. ती कशी येईल नर्मदालयात ?” लेपा (बैरागढ) येथे आमच्या ‘निमाड अभ्युदय’ या संस्थेच्या वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे माझं आजकाल भट्टयाण येथे नर्मदा किनारी असलेल्या नर्मदालयात वारंवार जाणं होत नाही. लॉक डाऊनच्या काळात तर तिथे जाणं शक्यही नव्हतं. त्यामुळे गेल्या दोन वर्षात नव्याने यायला लागलेल्या मुलांच्या कौटुंबिक स्थितीबद्दल मी जरा अनभिज्ञच होते. पण या मुलीच्या कहाणीने मात्र मला अस्वस्थ केलं. सोनी आमच्या नर्मदालयाच्या जवळच राहते. दिवसभर ती कधीच दिसत नाही. फक्त संध्याकाळीच घसरगुंडी खेळायला तिच्या बरोबर दोन छोटया मुलींना घेऊन येते. लॉक डाऊनच्या
आत्मभान
- Get link
- Other Apps
आत्मभान एका गावातील अत्यंत सज्जन, सुसंस्कारित, विद्वान वगैरे विशेषणं लावता येतील अशा व्यक्तीचा मृत्यू झाला असे लोकांना वाटले. खात्री करून घेण्यासाठी आणि स्मशान भूमीत मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असतं म्हणून एका डॉक्टरला बोलावण्यात आलं. डॉक्टरनी देखील त्या गृहस्थाला तपासून मृत्यू प्रमाणपत्र दिलं. लोकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. गावातल्या प्रथेप्रमाणे धर्मगुरू आले. त्यांनी आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. प्रेताला तिरडीवर बांधले. ‘राम नाम सत्य है’ म्हणत अन्त्ययात ्रा स्मशानात पोहोचली. तोपर्यंत तिरडीवरच्या शरीरात हालचाल सुरू झाली होती. खरं तर ते गृहस्थ मृत्यू पावलेच नव्हते. ते लोकांना व्याकुळ होऊन विनंती करू लागले, “मी मेलो नाहीये. कृपा करून मला जाळू नका. तिरडीला मला ज्या दोराने बांधला आहे तो सोडा. मी जिवंत आहे.” त्याचे नातेवाईक आणि परिचित लोक आश्चर्यचकित झाले. त्या गृहस्थाच्या अन्त्यसंस्कारासाठी आलेले लोक खूप शिकले-सवरलेले होते. त्यांनी तिथेच एक सभा घेतली. चर्चेअंती असे ठरले की एका उच्च शिक्षित- तज्ञ डॉक्टरने हे गृहस्थ मृत्यू पावले आहेत असे प्रमाणपत्र दिलंय. ते खोटं कसं असू
आत्मश्रद्धा
- Get link
- Other Apps
आत्मश्रद्धा एका गावात एक महात्मा रहात होते. आपल्या ध्यान-धारणे बरोबरच गावातल्या लोकांना त्यांच्या अडी-अडचणीच्या वेळी योग्य सल्ला ते देत. भांडणं सोडवत. त्यांची ख्याती आसपासच्या गावातही पसरली. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यन्त त्यांच्याकडे सल्ल्यासाठी लोकांची रांग लागायची. अनेक वर्ष सरली. लोकांच्या रोजच्या समस्यांना ते महात्मा कंटाळले. समस्या शांतपणे विचार करून किंवा परस्परांशी संवाद साधून सोडवल्या जाऊ शकतात असे त्यांना वाटे. पण लोक विचारच करत नाहीत – संवाद करत नाहीत याचे त्यांना वाईट वाटे. मी तर त्यांना काही फार मोठे तत्वज्ञान सांगत नाही. लोक केवळ मी साधू म्हणून माझ्याकडे सल्ला मागायला येतात. त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे माझी म्हणावी तशी साधनाही होत नाही. लोकानी शहाणं व्हावं असं त्यांना मनापासून वाटायचं. यावर उपाय काय ? त्यांनी खूप विचार केला. गावकऱ्यांची सभा घेतली आणि आपला निर्णय सांगितला. “गावकऱ्यांनो गेली अनेक वर्षं मी आपल्या समस्या सोडवतो आहे. माझी वैयक्तिक साधना देखील चालूच आहे. सांगायला आनंद होतोय की या साधनेमुळे मला एक सिद्धी प्राप्त झालीय. मात्र यापुढे मला मौनात आणि एकांतवासा
गोष्ट एक शाळेची (29)
- Get link
- Other Apps
गोष्ट एक शाळेची (29) मुलं बालवाडीतली असली तरी पालकांच्या समाधानासाठी परीक्षेचं नाटक करावंच लागतं. “मुलांना परीक्षा आहे असं सांगून टेन्शन देऊ नका. त्यांच्या नकळत आम्ही परीक्षा घेऊ. असं तर आम्ही सततच मुलांच्या प्रगतीकडे लक्ष ठेऊन असतो. सगळीच मुलं चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होणार आहेत.” हे पालकांना वारंवार सांगावे लागे. सहज म्हणून मी फळ्यावर चेंडूचे चित्र काढले. नुसताच गोल काढून कसं चालेल ? तो चेंडू वाटलाही पाहिजे. म्हणून मी त्याच्या मधोमध आडव्या रेषा काढल्या. “ओळखा हे काय आहे ?” एका सुरात उत्तर आलं, “दीदी, हा शनि (त्यांच्या भाषेत ‘हनि’ कारण ते स, श चा उच्चार ह करतात) ग्रह आहे.” मी आश्चर्यचकित. माझी चित्रकला काय दर्जाची आहे मला ठाऊक असलं तरी चेंडूला एकदम शनि ग्रह म्हटल्यावर माझ्या मेंदूला झिणझिण्याच आल्या. माझ्या धनू राशीला तेंव्हा साडेसाती चालू होती असं कुणी तरी मला म्हणालं होतं. पण तो ‘शनि’ एकदम वर्गात प्रकट होईल असं वाटलं नव्हतं. “तुम्हाला कसं रे माहित हा शनि ग्रह आहे ?” मी आश्चर्याने विचारले. मग रहस्य उलगडलं, महाभारत या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेच्या टायटल सॉन्गच्या वेळी शनि ग्रह दाखवला
सगुण-निर्गुण : लिपुलेखचा शंकर (महाराष्ट्र टाइम्स)
- Get link
- Other Apps
सगुण-निर्गुण : लिपुलेखचा शंकर (महाराष्ट्र टाइम्स) 1998 साली केलेली कैलाश-मानसरोवर यात्रा काही दिवसांपासून सतत डोळ्यापुढे येतेय. उत्तराखंड राज्यातील धारचुला येथून या पदयात्रेला आरंभ होतो. कालीगंगेचे प्रथम दर्शनही इथेच होते. हिचा प्रवाह इतका वेगवान की 1999 साली झालेल्या अतिवृष्टीने मालपा नावाचे एक छोटे गाव तिने गिळंकृत केलं. कैलाश यात्रेतील लिपुलेख हे भारतीय हद्दीतले सतरा हजार फुटावरचं शेवटचं ठिकाण. वाटेत एक विचार सारखा मनात येत होता- हा भागचीनव्याप्त तिबेट आणि नेपाळच्या सीमेला लागून आहे. इतकी वर्षं झाली स्वातंत्र्य मिळून पण आपले सैन्य आणि सामग्री तिथे पोहोचण्यासाठी रस्तेच नाहीत. शत्रूने अचानक हल्ला केला तर? हेच ‘लिपुलेख’ सध्या नेपाळने त्यावर आपला हक्क सांगितल्याने चर्चेत आहे. या क्षेत्रातला भारताचा सगळ्यात जास्त उंचीवरील आर्मीचा कॅम्प इथे आहे. इथूनच पुढे चीनव्याप्त तिबेटचा प्रदेश सुरू होतो. म्हणूनच देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचे ठिकाण. वर्षातले आठ –दहा महीने हा प्रदेश बर्फाने आच्छादलेला असतो. कैलाश यात्रेच्या वेळी जे काही यात्रेकरू दिसतील तेव्हढेच. न