आत्मश्रद्धा
आत्मश्रद्धा एका गावात एक महात्मा रहात होते. आपल्या ध्यान-धारणे बरोबरच गावातल्या लोकांना त्यांच्या अडी-अडचणीच्या वेळी योग्य सल्ला ते देत. भांडणं सोडवत. त्यांची ख्याती आसपासच्या गावातही पसरली. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यन्त त्यांच्याकडे सल्ल्यासाठी लोकांची रांग लागायची. अनेक वर्ष सरली. लोकांच्या रोजच्या समस्यांना ते महात्मा कंटाळले. समस्या शांतपणे विचार करून किंवा परस्परांशी संवाद साधून सोडवल्या जाऊ शकतात असे त्यांना वाटे. पण लोक विचारच करत नाहीत – संवाद करत नाहीत याचे त्यांना वाईट वाटे. मी तर त्यांना काही फार मोठे तत्वज्ञान सांगत नाही. लोक केवळ मी साधू म्हणून माझ्याकडे सल्ला मागायला येतात. त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे माझी म्हणावी तशी साधनाही होत नाही. लोकानी शहाणं व्हावं असं त्यांना मनापासून वाटायचं. यावर उपाय काय ? त्यांनी खूप विचार केला. गावकऱ्यांची सभा घेतली आणि आपला निर्णय सांगितला. “गावकऱ्यांनो गेली अनेक वर्षं मी आपल्या समस्या सोडवतो आहे. माझी वैयक्तिक साधना देखील चालूच आहे. सांगायला आनंद होतोय की या साधनेमुळे मला एक सिद्धी प्राप्त झालीय. मात्र यापुढे मला मौनात आणि एकांतवासा