मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....
नमस्कार ! भटकंतीची पाठशाळा या लेखमालेला केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून मराठी वाचक उदंड प्रतिसाद देत आहेत. अनेक नवीन वाचकांनी मी कोण, काय करते असे प्रश्न विचारलेत. लेखाच्या खाली मी आमच्या संस्थेच्या website ची लिंक दिली आहे. ती पाहिल्यावर संस्थेच्या कामाचा अंदाज येईल. आमच्या कडे मागच्या वर्षी कविता नावाची एक मैत्रिण शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आली होती. आमच्या वसतिगहात राहणाऱ्या काही मुलांच्या घरी ती जाऊन आली. त्यांचं आयुष्य तिने अनुभवलं आणि शब्दबद्ध केलं. तिचं लिखाण मला भावलं. म्हणून ते आपणा सर्वांबरोबर share करत आहे. आमच्या कडे वसतिगृहात मुलं कुठून येतात आणि त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे याचा अंदाज येईल. केवळ वसतिगृहातीलच नाहीत तर आपल्या तिन्ही शाळातील सर्वच मुले आपल्या कडे निःशुल्क शिकतात. ही सर्व मुले गरीबी रेषे खालील कुटुंबातील आहेत. अत्यंत दुर्गम अशा अलिराजपुर, बडवानी, खरगोन या जिल्ह्यातील आहेत. पुढचे तीनचार दिवस जरा इतर कामांमध्ये व्यस्त असेन म्हणून भटकंतीची पाठशाळाचा लेख पाठवता येणार नाहीत. तिने काढलेले काही फोटो देखील share करत आहे. मुलांची गृहभेट एक अविस्मरण