आत्मभान


आत्मभान

एका गावातील अत्यंत सज्जन, सुसंस्कारित, विद्वान वगैरे विशेषणं लावता येतील अशा व्यक्तीचा मृत्यू झाला असे लोकांना वाटले. खात्री करून घेण्यासाठी आणि स्मशान भूमीत मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असतं म्हणून एका डॉक्टरला बोलावण्यात आलं. डॉक्टरनी देखील त्या गृहस्थाला तपासून मृत्यू प्रमाणपत्र दिलं. लोकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. गावातल्या प्रथेप्रमाणे धर्मगुरू आले. त्यांनी आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली. प्रेताला तिरडीवर बांधले. ‘राम नाम सत्य है’ म्हणत अन्त्ययात्रा स्मशानात पोहोचली. तोपर्यंत तिरडीवरच्या शरीरात हालचाल सुरू झाली होती. खरं तर ते गृहस्थ मृत्यू पावलेच नव्हते. ते लोकांना व्याकुळ होऊन विनंती करू लागले, “मी मेलो नाहीये. कृपा करून मला जाळू नका. तिरडीला मला ज्या दोराने बांधला आहे तो सोडा. मी जिवंत आहे.” त्याचे नातेवाईक आणि परिचित लोक आश्चर्यचकित झाले. त्या गृहस्थाच्या अन्त्यसंस्कारासाठी आलेले लोक खूप शिकले-सवरलेले होते. त्यांनी तिथेच एक सभा घेतली. चर्चेअंती असे ठरले की एका उच्च शिक्षित- तज्ञ डॉक्टरने हे गृहस्थ मृत्यू पावले आहेत असे प्रमाणपत्र दिलंय. ते खोटं कसं असू शकेल ? धर्मगुरूने त्यांच्यासाठी अंतिम प्रार्थनाही केली आहे. त्यामुळे आपण ‘मृतदेह’ परत नेऊ शकत नाही. तसा ठराव पास झाला. काही जणांनी सत्य जाणून घ्या म्हणून करुणा भाकली . पण बहुमत वाल्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. तिरडीवरच्या गृहस्थालाही समस्या समजावण्यात आली. मग अन्त्यसंस्कार व्यवस्थित पार पडला.

या रुपक कथेचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. आमची संस्कृती, रीतीभाती, सणवार, आमच्या भाषा-लोकभाषा, कृषी पद्धती, आमची शिक्षण पद्धती, हे सारेच आम्ही आधुनिकतेच्या वा आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली किंवा परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळे मृत अथवा कालबाह्य ठरवतो आहोत. दूरदर्शन मालिकांच्या मोहात पडून दिवे लागणीच्या वेळी घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून ‘शत्रुबुद्धी विनाशाय’ अशी प्रार्थना शिकवणारी आमची संस्कृती आम्हाला आठवत नाही. अपरिग्रहाची शिकवण देणारी आमची जीवनपद्धती आम्ही विसरतो आहोत. समग्र व्यक्ति विकास करणारी आमची भारतीय शिक्षण पद्धती दूर सारून नोकरी लागल्यावर पॅकेज काय मिळेल ते शिक्षण देणारी व्यवस्था स्वीकारतो आहोत. विदेशी खाद्य पद्धती अनुसरून आमचे शरीर स्वास्थ्य बिघडवतो आहोत. सांस्कृतिक देवाण घेवाण वाईट नाही. पण चांगले वाईट काय याचेही आत्मभान वेळीच यायला नको का ?


भारती ठाकूर
नर्मदालय,
लेपा पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
https://narmadalaya.org/


Facebook -
https://www.facebook.com/narmadalaya.ngo


Blog -
https://narmada-bharati.blogspot.com/


Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) Documentary -
https://www.youtube.com/watch?v=9uU0PbZHqqc&t=155s


महाराष्ट्र टाइम्स सगुण निर्गुण -
https://maharashtratimes.com/…/sel…/articleshow/77351999.cms

Comments

  1. अतिशय चपखल दृष्टांत 👍

    ReplyDelete
    Replies
    1. Maharashtra Compatative exams study material free platforms Downloaded every spardha pariksha pdf paper here
      Previous Exams Old Paper PDF Download Arogya Vibhag Exams Paper Pdf

      Delete
  2. डोळ्यात अंजन घालणारा लेख...

    ReplyDelete
  3. ब्लॉग लिहिणं बंद केलं आहे का ?
    रोज एकदा उघडून बघतो आणि निराश होतो.
    😔

    ReplyDelete
  4. Maharashtra Compatative exams study material free platforms Downloaded every spardha pariksha pdf paper here
    Previous Exams Old Paper PDF Download Arogya Vibhag Exams Paper Pdf

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

आत्मश्रद्धा