गोष्ट एका शाळेची (26)

गोष्ट एका शाळेची (26)



शाळा सुटल्यावर मी घाई घाईने जेवण केलं. बस स्टँडवर गेले आणि काझीरंगाला जाणाऱ्या बसमध्ये जाऊन बसले. आतापर्यन्त अनेक प्रवास केलेत पण त्या दिवशी मात्र  एकटीने प्रवास करतांना  मनात थोडी धाकधूक होती. तिथे आपल्याला एकटीला करमेल का असंही सारखं वाटत होतं.  सखी म्हणाली, “You deserve a gift of solitude. Remember, solitude is an act of love and kindness to yourself. For this gift of solitude, you must shed your fear of walking unaccompanied.” 

मनातल्या मनात हसून मी सखीला म्हणाले, “How can I call it solitude when you are constantly accompanying me ? How can I walk alone ? Sakhi, please leave me alone at least for two days.”

सखी म्हणाली, “तेव्हढे सोडून बोल. मला ते शक्य नाही. एक गोष्ट लक्षात घे भारती. तुझ्या मागे पुढे रहायला - तुझ्या अवती भोवती घुटमळायला मी काही तुझी सावली नाही. I am your reflection. I will accompany you throughout your inner journey which will be the longest and most beautiful journey of your life. For this inner journey you need stillness of mind. Then only I can reflect.”

मी सखीला प्रतिक्रिया दिली नाही. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे सुरू झाले होते. त्याचा मंद मंद सुवासही येत होता. आसाममध्ये वर्षातून दोन-तीनदा भाताचे पीक घेतले जाते. काही ठिकाणी भाताच्या शेतात बांबूची बेटं होती. चहाचे मळे, भातशेती अथवा बांबूची बेटं बघून मात्र असं वाटलं नाही की आपण नवीन ठिकाण पाहतोय. निसर्ग आणि मी - काय नातं आहे आमच्यात ? सखीचं नेहमीचं वाक्य आठवलं-  Nature is prolongation of your wider self. बरेचदा असं वाटतं गवत, झाडं-झुडपं असोत वा पशू पक्षी असोत.  त्यांच्या आणि माझ्या श्वासात एक ताल आणि लय  आहे -  synchronisation आहे. एका अदृश्य सूत्रात आम्ही बांधले आहोत.  गाडी काझीरंगाच्या फाट्यावर कधी थांबली ते कळलंच नाही. 

अतिथीगृहाच्या व्यवस्थापकाला भेटले. ते म्हणाले, मी तुमची वाटच पाहत होतो. डॉ  बॅनर्जी यांचे दोन फोन येऊन गेले आपण पोहोचलात की नाही विचारायला. वनविभागाचे ‘अरण्य’ नावाचे ते अतिथि गृह होते. ब्रिटिशांच्या काळातील बांधकाम असावे. प्रशस्त खोल्या आणि नीटनेटकेपणा नजरेत भरला. आसपास जाणीवपूर्वक लावलेली आणि जतन केलेली वृक्षराजी होती. अनेक पक्ष्यांचे आवाज येत होते.  दुपारचे साडेतीन वाजले होते. व्यवस्थापक जातीने येऊन चौकशी करत होते. चहा -नाश्ता झाला. आज तर तुम्हाला जंगल सफारी साठी जाता येणार नाही. पण उद्या पहाटे पाच वाजताच तयार रहा. साडेपाच पर्यन्त जीप येईल आणि तुम्हाला हत्तीवरून जंगल दर्शनासाठी घेऊन जाईल. तिथून परतल्यावर जेवण करून जीपने जंगल सफरीची व्यवस्था केलीय. एक गाईड पण बरोबर असेल. एव्हढी माहिती देऊन ते निघून गेले. 
   
पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे बाहेर पडले नाही. छत्री सोबत होती पण पुन्हा ताप यायला नको म्हणून खबरदारी. व्हरांड्यातल्या  खुर्चीत जाऊन बसले.  बरसणारा पाऊस - त्यात चिंब भिजणारी झाडं आणि  वळचणीला बसलेले पक्षी. We were together yet enjoyed our solitude independently.  वेळ कसा गेला समजलंच नाही. अंधार पडला आणि खोलीत परतले. 
   
रात्री जेवण झाल्यावर पुन्हा व्हरांड्यात जाऊन बसले. पाऊस थांबला होता पण बाहेर अगदी मिट्ट अंधार होता. झाडंही दिसत नव्हती. झाडावरून  खाली पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांचा मंदस्वरात पण लयबद्ध आवाज येत होता. असंख्य काजव्यांचे नर्तनही  चालू झाले. निसर्गाचा हा light and sound show फक्त माझ्याच साठी होता. 

रात्रीचे दहा वाजले. खोलीत परतले. डायरी लिहायला बसले आणि लक्षात आलं की मी दुपारी गाडीत बसले तेव्हापासून आतापर्यन्त  सोना, बांधकाम, शाळा, नाशिक यापैकी कुठलाच विचार मनात नव्हता. डायरी बंद करून पलंगावरच मांडी घालून प्रार्थनेला बसले. गंमत म्हणजे रोजच्या पाठ केलेल्या प्रार्थनांपैकी एकही प्रार्थना ओठावर आली नाही.  कुठलाच विचार मनात नव्हता. सखी म्हणाली त्या ‘stillness of mind’ ची ही बहुधा सुरुवात असावी. 

झोपण्यासाठी पलंगावर पाठ टेकवली तेंव्हा मात्र सखी म्हणाली, “पाठ केलेली प्रार्थना ठरलेल्या वेळी म्हटली की एक नित्यकर्म पार पाडलं एव्हढाच भाव त्यात असेल तर त्या प्रार्थनेला काय अर्थ आहे ? आयुष्याचा प्रत्येक क्षण - प्रत्येक कृती प्रार्थना नाही का होऊ शकत तुझी ? निदान तसा प्रयत्न तरी ?”



भारती  ठाकूर
नर्मदालय,
लेपा  पुनर्वास (बैरागढ)
जिल्हा खरगोन
मध्य प्रदेश
Email - narmadalaya@gmail.com

Website -
 
Facebook -
 
Blog -

Nimar Abhyudaya Rural Management And Development Association  (N.A.R.M.A.D.A) Documentary - 

Comments

  1. सखीला देखील " leave me alone " सांगायची कल्पना खूप आवडली.
    शेवटचा परिच्छेद माझ्यासाठीच आहे असं समजून धडा घेण्याचा प्रयत्न करतो.

    ReplyDelete
  2. असल्या एकांताची आम्हालाही आस असते. पण त्यासाठी तुम्ही जे परिश्रम केले आहेत ते करण्याची आमची तयारी नसते.

    ReplyDelete
  3. 'आयुष्याचा प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती प्रार्थना व्हावी,' आजपासून हीच प्रार्थना 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुलांची गृहभेट एक अविस्मरणीय अनुभव.....

मातृत्व