Posts

Showing posts from May, 2020

गोष्ट एका शाळेची (11)

गोष्ट एका शाळेची  (11) औषधांचा परिणाम असेल कदाचित पण रात्री बारा नंतर खूप गाढ झोप लागली. सकाळी आठ वाजता डॉ. खोंड आणि सिविल सर्जन डॉ. बोरगोहाय मला तपासायला आले. १०२ डिग्री  ताप अजूनही होताच . आणखी  नवीन काही औषधे चालू केली. सलाईन तर चालूच होतं. मी दवाखान्यात अॅडमिटआहे ही बातमी मुलांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांना समजली. एकेक जण मला भेटायला येऊ लागले. कुणी चहा-दूध, फळं-बिस्किटस् आणली तर कुणी डॉक्टरांनी  लिहून दिलेली औषधे आणून दिली. दीप्तीने नाशिकच्या कर्नल फडकर यांच्याकडे निरोप  पाठवला.  फडकर दादा वहिनी निरोप समजताच  मला भेटायला  दवाखान्यात आले.  त्याच वेळी  प्रायव्हेट रूम रिकामी झाली  असून  सफाई करून तयार आहे,  तिकडे शिफ्ट व्हा  असा निरोप आला. ज्या पलंगावर मी झोपले होते तो पलंग आणि गादी पांघरूण-  मच्छरदाणी हे सगळं दीप्तीच्या घरचं होतं.  तिथेच सोडून कसं चालेल ?  मला फडकर दादा वहिनींना  हे सांगायचा  संकोच होत होता. आणि ते सामान तिथे टाकून प्रायव्हेट रूम मध्ये जाता येत  नव्हतं. मी प्रायव्हेट रूम मध्ये का जात नाही याचे उत्तर मला द्यावेच लागले. त्यात संकोच का करतेस असं म्हणत  माझी गादी, पा

गोष्ट एका शाळेची (10)

गोष्ट एका शाळेची  (10) पद्मश्री डॉ. रॉबिन बॅनर्जीचा जन्मदिवस १२ ऑगस्टला असतो  म्हणून त्यांच्याच इच्छेनुसार सुरू होणाऱ्या या शाळेचं उद्घाटनही आम्ही १२ ऑगस्ट १९८८ रोजी करायचं ठरवलं. ते मात्र लंडन-मेक्सिकोच्या दौऱ्यावर होते. ते इथे असते तर शाळेचं उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झालं असतं. गोलाघाटमधल्या अनेक मान्यवरांना उदा. इथल्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. नेओग तसंच नगरपालिकेचे अध्यक्ष लखी बरुआ वगैरेंना विनंती केली - पण भूमिपूजनाच्या वेळी झालेला वेगवेगळ्या संघटनांचा विरोध लक्षात घेता सर्वांनीच नकार दिला. शेवटी ठरवलं केवळ सरस्वती वंदना आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन झालं म्हणून जाहीर करायचं. एकूण 28 मुलांची शाळेत प्रवेशासाठी नाव नोंदणी झाली.  28 पालकांनी तरी माझ्यावर विश्वास दाखवला ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची बाब होती.  जसजशी 12 ऑगस्ट ही तारीख जवळ यायला लागली, एका अनामिक भीतीने मला ग्रासलं.  कुणी दरवाज्यावर टकटक केली तर दरवाजा उघडायला पण भीती वाटायची. पुन्हा कोणी धमकी द्यायला तर येणार नाही ? डॉक्टर बॅनर्जी पण इथे नाहीत .आपलं  काही बरं वाईट झालं तर ?  या अपरिचित गावात आपण शाळा सुरू करतोय.

गोष्ट एका शाळेची (9)

गोष्ट एका शाळेची  (9) गोलाघाट मधील सत्यसाई बाल  विकास केंद्राच्या सभागृहात मी योगासन वर्ग घेत असे. अनेक महिला त्यात उत्साहाने भाग घेत. अशा प्रकारचा केवळ महिलांसाठीचा असा योगासन वर्ग गोलाघाटला त्या काळात म्हणजे बत्तीस वर्षापूर्वी बहुधा पहिलाच असावा. गीताली द्वारा (Dwarah) नावाची चौथीतली एक मुलगी तिच्या आईबरोबर येत असे. तिच्या आईला मी द्वारा बाइदेव (ताई) म्हणायची. दोघी स्वभावाने खूपच छान होत्या. मुलगी तर खूप बोलकी आणि चौकस होती. योगासन वर्ग संपल्यावर रोज निरोप घेतांना ती मला आवर्जून तिच्या घरी यायचं आमंत्रण द्यायची. म्हणायची “तू माझ्या घरी येशील ना तेंव्हा मी आईला लुसी (पुरी) भाजी आणि रसगुल्ले बनवायला सांगीन”. मी देखील हो ‘नक्की येईन हं लवकरच’ असं आश्वासन द्यायची.  दरम्यान खटखटी येथील विवेकानंद केंद्राच्या ग्रामीण विकास केंद्रात एका युवक शिबिरासाठी मला जावं लागलं. शिबिर संपल्यावर मी गोलाघाट येथे परतले. एक अत्यंत वाईट बातमी आल्याआल्याच समजली. माझ्या योगासन वर्गाला येणाऱ्या गीतालीचे  Encephalitis या आजाराने अचानक निधन झाले.  हा देखील एक viral fever चा  प्रकार. मी सुन्न झाले. कशातच मन लागेन

गोष्ट एका शाळेची (8)

गोष्ट एका शाळेची (7)

गोष्ट एका शाळेची (7) 1986 सालापर्यंतचं नाशिक मधलं आयुष्य आता आठवलं तरी स्वत:चाच हेवा वाटतो. गिर्यारोहण, पद भ्रमण, नाशिक ते दिल्ली सायकल प्रवास आणि वेगवेगळ्या अभयरण्यातून मनसोक्त भटकंती. मनात येईल तेंव्हा सिनेमा, नाटकं, संगीताचे कार्यक्रम आणि चांगली व्याख्याने यात रमणारी मी. असं सगळं असतांना मग अचानक हे समाजकार्याचं खूळ कुठून आलं ?   नेमका हाच प्रश्न मला आज दीप्ती ने विचारला.  - तू विवेकानंद केंद्रात का आलीस ? केवळ विवेकानंदांचे साहित्य किंवा त्यांचे जीवन चरित्र वाचले म्हणून ? नक्कीच नाही. तू नेहमी सांगतेस तो सुंदर बाग असलेला बंगला, नाशिकला  संरक्षण खात्यातील नोकरी आणि कुठलीच आर्थिक अथवा कौटुंबिक जबाबदारी नसतांना - आयुष्य सुरळीत चालू असतांना असं काय घडलं की घर सोडून यावसं वाटलं?  तिच्या या प्रश्नावर मला मनापासून  हसू आलं.  आम्ही बसलो होतो तिथल्या टेबलावर 'कथा विवेकानंद शिला स्मारकाची' (Story of Vivekananda Rock Memorial)  हे पुस्तक होतं. ते पुस्तक तिच्या हातात देत म्हणाले या पुस्तकामुळे मी विवेकानंद  केंद्रात आले.  या पुस्तका बरोबरच सेवा साधना  आणि विवेकानंदांचे सा

गोष्ट एका शाळेची (6)

गोष्ट एका शाळेची (6) गोलाघाटचे माझे  निवास स्थान  म्हणजे सहा छोट्या छोट्या खोल्यांचा बंगला असला तरी छत पत्र्याचे   होते.  पाऊस पडला कि ते पत्रे खूप वाजत आणि झोप लागत नसे. आसाममध्ये  प्रत्येक घराच्या जवळपास एखादी पोखरी -  म्हणजे छोटेसे तळं  असतंच. ते  जर वापरात नसेल तर डास खूप होत. आणि आसाम तर मलेरियाचे माहेरघरच आहे.  शिवाय या बंगल्यात पिण्याच्या पाण्याचा किंवा सांडपाण्यासाठी सुद्धा नळ  नव्हता.  ते सर्व पाणी मला माझ्या घरमालकिणीच्या नळावरून भरावे लागत असे. एक हॅन्ड पंप होता अंगणात पण  त्याचं पाणी विटकरी रंगाचं  असायचं.  तासभर पाणी बादलीत राहिलं तर खनिज तेलाचा तवंग त्यावर यायचा.  मी थट्टेने म्हणायचे की माझ्या अंगणात खनिज तेलाची विहीर आहे म्हणजे मी किती श्रीमंत !  पाण्याचा नळ पहाटे पाच वाजता यायचा  आणि घरमालकिणीच्या अंगणात जाऊन तिथून बादल्या भरून  प्यायला,  भांडी आणि कपडे धुवायला  अंघोळीला -पोच्या  लावायला असे किमान  वीस-पंचवीस बादल्या पाणी आणावे लागे.  उशिरा उठलं  तर घरमालकिणीच्या  पाणी भरण्याची वेळ झालेली असे. या बंगल्याला बांबू कापून त्याचे  कुंपण केलेलं होतं. त्यावर अनेक प्रकार

गोष्ट एका शाळेची (5)

गोष्ट एका शाळेची (5) मला धमकावून- थोडा दिलासाही देऊन ती मुलं निघून गेली.   एकीकडे मी मनाला धीर देत होते.  पण खूप अस्वस्थही  वाटत होतं.  डोळे बंद करून बराच वेळ दिर्घ श्वसन करून पाहिलं अस्वस्थता कमी होईना . स्वामी विवेकानंदांचे एक छोटेसे पुस्तक Thus Spake Swami Vivekananda  टेबलावर होते.  जे पान उघडलं त्यावर पहिलं वाक्य होतं-  कुठलेही मोठे काम करत असताना तुमच्या मार्गात जर खूप अडचणी येत असतील तर विश्वास ठेवा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. हे वाचल्यानंतर थोडीशी रिलॅक्स झाले.  रात्रभर पाऊस पडतच  होता.  जोडीला विजांचा कडकडाट देखील.  वर्षातले जवळजवळ आठ महिने बरसणाऱ्या या आसामच्या पावसाशी आता जुळवून घ्यायला हवं. विचारांनी आणि पावसाच्या आवाजानी रात्रभर झोप तर आली नाहीच. पहाटेच थोडा डोळा लागला होता. पण  पुन्हा पाच वाजता कोकिळेच्या आवाजाने जाग आली.  पहाटेचा गारवा खूप सुखद वाटत होता.  अस्वस्थ मनाला शांत करण्यासाठी कुठेतरी दूर  फिरायला जावं असा विचार मनात आला. खरं तर ती माझी नळावरून पाणी भरण्याची वेळ. पण  आज  आहे तेवढ्या पाण्यात  भागवू  असे ठरवून दरवाज्याला कुलूप लावून बाहेर पडले.  नेहमीप

गोष्ट एका शाळेची ( भाग 4)

गोष्ट एका शाळेची ( भाग 4) गोलाघाटला भूमिपूजनाच्या वेळी वेगवेगळ्या संघटनांनी केलेल्या निदर्शनांमुळे काही दिवसांसाठी मला गोलाघाट सोडून कधी आसाममधील तिनसुकिया येथे तर कधी नागालँड मधील दिमापूर येथील विवेकानंद केंद्रात रहावं लागलं. दोन्ही ठिकाणी योगासन वर्ग घेण्यापलीकडे माझ्यावर फारशी काही जबाबदारी नव्हती. दिवस वाया जात होते आणि मला तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा वाटत होता. केवळ योगासन वर्ग घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत का? त्यापेक्षा नाशिकला परत जावं हेच बरं. उदासी दिवसेंदिवस वाढत होती . सुदैवाने ईशान्य भारतातील २२ महाविद्यालयीन युवतींना घेऊन कन्याकुमारीला 'व्योमा' या अखिल भारतीय युवा शिबिराला जायची संधी मिळाली. कन्याकुमारीला पोहोचल्यावर माननीय श्री. बाळकृष्णनजी व डॉ. लक्ष्मीकुमारी यांच्याशी या संदर्भात बोलले. अर्थातच माझ्या परत जाण्याला दोघांनीही नकार दिला. श्री. बाळकृष्णनजी म्हणाले, "गोलाघाटला राहशील एकटी?" "हो, फक्त डॉ. बॅनर्जीच्या घरी राहाणार नाही. कारण त्या भव्य वास्तूत सर्वसामान्य माणसं सहज येऊ शकत नाहीत. शिवाय तिथे मला बालवाडी, संस्कारवर्ग, योगासन वर्ग

गोष्ट एका शाळेची (भाग 3)

गोष्ट एका शाळेची (भाग 3)  1985 नंतरचा हा काळ आसाम राज्याच्या दृष्टीने परिवर्तनाचा काळ  होता. 1979 पासून सुरू झालेलं आसाम आंदोलन मुख्यत: बिहारी आणि बंगाली लोकांच्या -  त्यातही विशेष करून बांग्लादेशी  घुसखोरांच्च्या विरोधात होतं . ब्रिटिश काळात चहाचे मळे विशेष करून इंग्रजांच्या ताब्यात होते. मजूरी कमी द्यावी लागते म्हणून त्यांनी बिहारी मजुरांना या चंहाच्या मळ्यांमध्ये काम करण्यास प्रवृत्त केलं.मुनीम किंवा ठेकेदारांच्या रूपात बंगाली लोक आले. आदिवासी बाहुल्य असलेला हा प्रदेश.  त्यातही स्वातंत्र्यपूर्व काळात  शिक्षणाच्या संधी या प्रदेशात फार कमी असल्याने  व्यापार प्रामुख्याने  मारवाडी लोकांच्या ताब्यात होता.   1971 च्या बांगला देश (पूर्व पाकिस्तान ) युद्धानंतर लाखों बांग्लादेशी मुसलमान भारतात शरणार्थी म्हणून आले. आसामी लोकाना रोजगार मिळेनासा झाला. प्रश्न आता फक्त रोजगाराचा न राहता आसामी जनतेच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा  झाला होता. या आंदोलनात ऑल आसाम स्टुडंट्स यूनियन (AASU - आसू) या संघटनेचा प्रामुख्याने सहभाग होता. प्रचंड नर संहार  हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य . चार लाखाहून अधिक बांग्लाद

गोष्ट एका शाळेची (भाग 2)

गोष्ट एका शाळेची  (भाग 2) गोलाघाट - स्वप्नातलं वाटावं असं हे टुमदार गाव. गावाच्या चहू बाजूंनी चहाचे मळे तर गाव वेगवेगळ्या वृक्षांनी नटलेलं. महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण' याचे वृक्ष इथे शेकडोंच्या संख्येने आहेत. आसामच्या राज्यपुष्पाचे नाव नॉहोर. पांढऱ्या रंगाचे आणि आत पिवळे पराग असलेलं हे नाजूक फुल. नॉहोर वृक्षही बहरले की पाने दिसतच नाहीत. या वृक्षांच्या जोडीने गुलाबी कॅशिया, गुलमोहोर, बकुळ आणि अमलताश (बहावा) यांचेही अनेक वृक्ष गोलाघाटमध्ये आहेत. प्रत्येक ऋतुत गोलाघाट गावाला कुठली ना कुठली फुलं माळता यावीत अशीच जणू काही निसर्गाची रचना. इथली घरंही देखणी. बांबूच्या भिंतींना मातीचे नाहीतर सिमेंटचे प्लॅस्टर असते. पर्जन्यमान जास्त असल्याने घरं उतरत्या छपराची. प्रत्येक घरासमोर छोटी का असेना पण बाग असतेच. परसदारी पुखरी (छोटेसे तळे),फणसाची व सुपारीची झाडं आणि स्वत:च्या कुटुंबाला पुरेसा भाजीपाला लावलेला असतो. इथल्या गृहिणी खरंच 'सुगृहिणी' आहेत. घर नेहमीच नीटनेटकं आणि कलात्मक पद्धतीने सजवणाऱ्या. स्वयंपाक घर छोटंसंच आणि आवश्यक तेवढंच सामान असलेलं असतं. आसामी लोकांची भाषा ऐक

गोष्ट एका शाळेची

Image
गोष्ट एका शाळेची कोविड 19 च्या लॉक डाऊनमुळे का होईना पण गेल्या अनेक वर्षात मिळाला नाही असा निवंतपणा आजकाल मिळतोय. तेंव्हापासून  जुन्या डायऱ्या वाचायचा एक छंदच लागलाय. जुन्या डायऱ्यांना  एक वेगळाच सुगंध असतो, फक्त आपल्यालाच जाणवणारा. त्या वाचायला लागलं की त्यातली माणसं जणू पुन्हा भेटतात. त्यापैकी काही माणसं तर आता हे जगही सोडून गेलीत. त्यांच्या बरोबरचे ओले-हळवे क्षण पुन्हा जिवंत करतात या डायऱ्या. कालही असंच घडलं. १९८७ सालचा एप्रिल महिना. एका मिटिंगमध्ये कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राचे तत्कालीन सचिव बालकृष्णनजी विवेकानंद केंद्राच्या आसाममधील गोलाघाट या गावी नव्यानेच सुरू करायच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती देत होते. गोलाघाट येथे शाळा सुरू करण्यासाठी प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ व छायाचित्रकार पद्मश्री डॉ. रॉबिन बॅनर्जी यांनी जमीन दान केली होती. काझीरंगा या अभयारण्याचे ते संस्थापक अध्यक्ष. हे अभयारण्य एकशिंगी गेंडा आणि वाघ यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. बाळकृष्णनजी ही माहिती खास त्यांच्या स्टाईलने इंग्रजीतून सांगत होते. माझ्याकडे पाहात ते हसत म्हणाले, "Dr. Robin Banerjee is very fond of